First blog post

This is the post excerpt.

Advertisements

This is your very first post. Click the Edit link to modify or delete it, or start a new post. If you like, use this post to tell readers why you started this blog and what you plan to do with it.

post

You n me

पहिल्यासारखी नसते…
तुझ्या Msg ची रास,
पाहिल्यासारखे नाही…
होत आपले Call खास,
हां पण सदैव सोबत आहे तुझा आभास.

पाहिल्यासारखे नाही…
होत आपले बोलणे,
पाहिल्यासारखे नाही…
होत आपले भेटणे,
हां पण नित्य असते तुझे स्वप्नात येणे.

ती

ती समोर असताना …
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी ‘हाय हाय’ करत घायाळ व्हावं ..

तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..

तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं .. सोबत तिच्या..
तिने कित्ती साधं रहावं ..

त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव .. अदांवर तिच्या..
तिचं उदास होणं.. कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं.. अश्रूंनी तिच्या..

तिचं हसणं कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..
तिच्या नजरेने मलाच शोधावं..

अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..
तिने फक्त माझंच रहावं..

मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..♥

ती

ती आयुष्यात आली …….
ती आयुष्यात आली
कसी आली कळलेच नाही ….
का मी तीला स्वतः आणले
मला खरच माहित
नाही …
पण ती आली आयुष्यात
एक थंड हवेची झुळूक बनून …
विराण झालेले माझे विश्व
बहरले तीचे होऊन …
ती एक निखळ झरा
मी एक संथ नदी ….
कसे जमले हे धागे
काहीच कळले नाही …
पण ती आली आयुष्यात
कशी आली खरच कळले
नाही …